मुंबई : विराट कोहली इंग्लंडच्या विरोधात वनडे सिरीजपासून भारतीय संघाचा तिनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. विराट टेस्ट सामन्यांमध्ये आधीपासून कर्णधारपदाची जबाबदारी निभावतो आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला महेंद्र सिंग धोनीने राजीनामा दिल्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटचा कर्णधार देखील विराटला केलं गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा पाच पैकी चार सामन्यांमध्ये पराभव करत भारताने टेस्ट सिरीजवर विजय मिळवला. वनडेमध्ये ही २-१ ने सिरीजवर विजय मिळवला. पण आता टी-२० सिरीजवरही विजय मिळवण्याची संधी विराटकडे आज आहे.


दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. बंगळुरुमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आज जर भारताने विजय मिळवला तर विराटच्या नावावर एक रेकॉर्ड बनणार आहे जो धोनीच्या नावावर देखील नाही.


आजचा सामना जिंकल्यानंतर विराट कोहली पहिला असा भारतीय कर्णधार ठरणार आहे ज्याने पहिल्यांदाच कर्णधार होताच एकापाठोपाठ वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये सिरीज आपल्या खिशात घातली आहे.


महेंद्र सिंह धोनी देखील हा रेकॉर्ड नाही बनवू शकला. 2007 मध्ये टी-20 टीमचा कर्णधार झाल्यानंतर धोनीने भारताला वर्ल्ड चँपियन बनवलं. त्यानंतर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताच्या दौऱ्यात वनडे सीरीजमध्ये भारताला 2-4 ने हरवलं होतं. त्यामुळे धोनीच्या नावे हा रेकॉर्ड बनू शकला नाही.