मुंबई : भारतीय संघावर सात विकेट राखून विजय मिळवत वेस्ट इंडिज संघाने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या षटकांत वेस्ट इंडिजचला विजयासाठी ८ धावांची गरज होती. धोनीने चेंडू विराट कोहलीच्या हातात सोपवला. पहिल्या दोन चेंडूत वेस्ट इंडिजला केवळ एक धाव काढण्यात यश मिळाले. दोन चेंडूत एक धाव काढता आल्याने विजय भारताच्या बाजूने झुकेल असे वाटले होते. 


मात्र त्यानंतर पुढच्याच चेंडूत वेस्ट इंडिजने चौकार ठोकला. तेव्हा ३ चेंडूत ३ धावांची गरज होती. चाहत्यांच्या मनात धाकधूक सुरु होती. मात्र तिसऱ्या चेंडूवर सीमन्सने षटकार ठोकला आणि चाहत्यांमध्ये एकच शांतता पसरली. षटकार लगावल्यानंतर कोहली काही काळ मैदानावर स्तब्धच राहिला. पराभवाचे दु:ख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. भारतीय चाहतेही सपशेल निराश झाले. एकीकडे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर आनंद लपत नव्हता तर दुसरीकडे मात्र चाहत्यांसह भारतीय क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.