मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटर विराट कोहली सध्या भारतातील दोन लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. तुम्हाला माहीत आहेत या दोन्ही व्यक्तींची एकमेकांबद्दल काय मत आहेत ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे अनेक क्षण आले ज्यावेळी मोदी आणि कोहली यांनी एकमेकांची स्तुती केली. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर विराटने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच विराट जेव्हा मोठी खेळी करत असे तेव्हा मोदींनी त्याची ट्विटरवरुन स्तुती केलीये. 


सीएनएनवर झालेल्या एका मुलाखतीत विराटला मोदींच्या व्यक्तिमत्वाबद्दल एका शब्दात सांगायला सांगितले तेव्हा मोदी म्हणजे आत्मविश्वास असे त्याने उत्तर दिले. विराट म्हणाला, जेव्हा मी मोदींबाबत विचार करतो तेव्हा माझ्या डोक्यात आत्मविश्वास हा शब्द येतो.