सेहवागने उडवली शोएब अख्तरची `खिल्ली`, अख्तरने दिले उत्तर?
२५ व्या सुल्तान अझल शाह कप हॉकी टुर्नामेंटच्या राउंड रॉबिन लीग मॅचमध्ये भारतीय पुरूषांनी पाकिस्तानला ५-१ ने पराभूत केले.
नवी दिल्ली : २५ व्या सुल्तान अझल शाह कप हॉकी टुर्नामेंटच्या राउंड रॉबिन लीग मॅचमध्ये भारतीय पुरूषांनी पाकिस्तानला ५-१ ने पराभूत केले.
या सामन्यानंतर माजी क्रिकेटर वीरेंद्र सहवागने एक ट्विट केला जो व्हायरल झाला आहे. भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
मॅचनंतर सेहवागने पाकिस्तानचा माजी फास्ट गोलंदाज शोएब अख्तरची मस्करी केली.
काय म्हणाला सेहवाग
सेहवागने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान कधीच भारताला पराभूत करू शकला नाही या विक्रमाची आठवण करून अख्तरची मस्करी केली आणि हल्लाबोल केला. तो म्हणाला, 'माफ करना शोएब भाई हॉकी में भी मौका हाथ से निकल गया।'
शोएबचं उत्तर
यावर शोएब अख्तर कुठे गप्प बसणार त्याने सेहवागला उत्तर दिले. 'मेरा भाई वीरू कुछ भी कहे वह माफ है। क्योंकि उसका दिल सोने का है और उसका कहने का मतलब बुरा नहीं है। लेकिन वह मजाकिया है और मैं उसका जवाब दूंगा।'
सेहवागच्या या कमेंटवर शोएबने दिलेल्या उत्तरानंतर त्याच्या फॅन्सने त्यांची खूप प्रशंसा केली आहे.
विशेष म्हणजे टी-२० वर्ल्ड कप दरम्यान कमेंट्री करताना सेहवागने शोएबची मस्करी केली होती. सेहवागने अनेक वेळा शोएबच्या गोलंदाजीची केलेली फटकेबाजीची आठवण करून दिली होती.