योगेश्वर दत्तबाबत सेहवागचे मजेशीर ट्विट
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक दिले जाणार आहे.
मुंबई : भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक दिले जाणार आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तने कांस्यपदक जिंकले होते. तर रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला रौप्यपदक मिळाले होते.
मात्र रिओ ऑलिम्पिकपूर्वी करण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत बेसिक दोषी आढळल्याने त्याचे रौप्यपदक योगेश्वरला देण्यात येणार आहे. योगेश्वरला रौप्यपदक मिळणार असल्याने भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने मजेशीर ट्विट करुन त्याला शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेत क्रिकेट अपग्रेड होतंय. नेहराचा स्मार्टफोनही अपग्रेड झालाय आणि योगेश्वर दत्तचेही कांस्यपदक अपग्रेड होऊन रौप्यपदक होणार आहे, असे विरुने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.