मुंबई : रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या मरियप्पन थांगवेलूने सुवर्ण पदक पटकावलं. मरियप्पनला टी42 उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक मिळालं. मरियप्पने 1.89 मीटरची उंच उडी घेत पहिले स्थान पटकावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सुवर्ण कामगिरी करणाऱ्या मरियप्पनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं त्याच्या खास शैलीत मरियप्पनला शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छा देताना सेहवागनं कौटुंबिक परिस्थितीमुळे हातात बंदुका घेतल्याचा दावा करणाऱ्यांचे कान टोचलेत. 


सेहवागनं मरियप्पनच्या आईचा एक फोटो ट्विट केला आहे. मरियप्पनची आई सरोजा भाजी विकते.  कौटुंबिक परिस्थितीचं कारण देऊन हातात बंदुका घेणाऱ्यांसाठी ही चपराक असल्याचं सेहवाग म्हणाला आहे.