साक्षी मलिकला सेहवागच्या शुभेच्छा, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही चपराक
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
रिओ: ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
साक्षीनं 58 किलो वजनीगटात किर्गिस्तानच्या आयसूलू तायनाबेकोव्हर मात करत ब्राँझ मेडलची कमाई केली. कुस्तीमध्ये ब्राँझ मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
या विजयामुळे साक्षी मलिकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनंही खास त्याच्या शैलीमध्ये ट्विटरवरून साक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना सेहवागनं स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांना जोरदार चपराक मारली आहे.
स्त्री भ्रूण हत्या केली नाही तर काय होऊ शकतं हे साक्षीनं दाखवून दिलं आहे. जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा आपल्या मुली त्याच्याशी सामना करतात आणि अभिमानास्पद कामगिरी करतात, असं ट्विट सेहवागनं केलं आहे.