व्हिडिओ : मुख्यमंत्री चंद्राबाबू आणि पीव्ही सिंधूने खेळले स्टेजवर बॅडमिंटन
हैदराबादमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर भारताची ओलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी व्ही सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचा आज आंध्रप्रदेशात सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली : हैदराबादमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर भारताची ओलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी व्ही सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचा आज आंध्रप्रदेशात सत्कार करण्यात आला.
बातमीच्या खाली व्हिडिओ आहे
सिंधू ही एकमेव महिला आहे जिने ऑलिम्पिकमध्ये सिव्ल्वह मेडलची कमाई केली आहे. सिंधूने विजयवाडा एअरपोर्ट ते इंदिरा गांधी स्टेडिअमपर्यंत रोड शो केला त्यानंतर स्टेडिअममध्ये सिंधू आणि गोपीचंद यांचा सत्कार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सिंधूला ३ कोटी रुपयांचा चेक राज्य सरकारकडून देण्यात आला.
सत्कार सोहळ्यानंतर चंद्राबाबू आणि पी व्ही सिंधू यांनी स्टेजवर बॅडमिंटन खेळले. त्यावेळी उपस्थितांनी या अनोख्या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला.
सिंधू आण गोपीचंद यांनी कृष्णा नदीत पवित्र डुबकी घेतली. सध्या १२ दिवसांपासून कृष्णा नदी महोत्सव सुरू आहे.