नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही ना काही किस्से घडत असतात. असाच काहीसा मजेदार किस्सा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फवाद अहमदसोबत घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कधी यापूर्वी ऐकलंय का की एखादा फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात उतरताना आपली बॅट आणायला विसरला. तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे हे. फलंदाज आपली बॅट कसा काय विसरु शकतो. मात्र असे घडलेय. ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शील्ड चषक स्पर्धेदरम्यान हा मजेदार किस्सा घडलाय. 


व्हिक्टोरियाचा फलंदाज फवाद अहमद फलंदाजीसाठी उतरला. मैदानातून खेळपट्टीच्या दिशेने जात असताना त्याने हेल्मेट घातले, ग्लोव्हजही घातले मात्र काही अंतरावर जाताच त्याच्या लक्षात आले की आपण बॅटच घ्यायला विसरलोय. 


जेव्हा त्याच्या हे लक्षात आले तेव्हा तो पटकन मागे बॅट घेण्यासाठी वळला आणि त्याच्या सहकाऱ्याने बॅट त्याच्या हातात सोपवली. क्रिकेटच्या इतिहासात असा मजेदार किस्सा पहिल्यांदाच घडला.