मुंबई : टी२० वर्ल्डकपमध्ये भारताची 'विराट' विजयासह घोडदौड सुरूच आहे... या वर्ल्डकपमध्ये बऱ्याचदा भारतीय क्रिकेटर विराट कोहली याची तुलना क्रिकेटचं दैवत मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरशी केली गेली... आणि ते साहजिकच होतं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, तुम्हाला माहीत आहे का, विराटबद्दल सचिननं २०१२ सालीच भविष्यवाणी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाचं शतक ठोकणाऱ्या सचिनचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तेव्हा सचिननं ही भविष्यवाणी केली होती. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यावतीनं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.


यावेळी, सचिनला तुझा रेकॉर्ड कोण तोडू शकेल असं वाटतंय? असा प्रश्न विचारल्यानंतर अत्यंत प्रांजळपणे सचिननं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर आपला विश्वास व्यक्त केला होता.