बसमध्येही कॅरेबियन टीमचा जल्लोष
टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर चार विकेट राखून विजय मिळवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरले. ब्राथवेटने चौथ्या चेंडूत षटकार ठोकल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
कोलकाता : टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर चार विकेट राखून विजय मिळवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरले. ब्राथवेटने चौथ्या चेंडूत षटकार ठोकल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
मैदानात तर त्यांनी जल्लोष केला. मात्र त्यानंतर बसमध्येही या टीमने चॅम्पियन चॅम्पियन गाण्यावर डान्स केला. वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने सहकाऱ्यांसोबत सेल्फी काढत आपला आनंद साजरा केला.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा सामना चांगलाच रंगला. अखेरच्या षटकात त्यांना विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होते. बेन स्टोक्सची ओव्हर होती. हे आव्हान अवघड असले तरी अशक्य नक्कीच नव्हते. स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर ब्राथवेटने षटकार खेचत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर सलग दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. यामुळे विजयाचे पारडे पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकले. त्यानंतर त्याने सलग दोन चेंडूत दोन षटकार ठोकत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.