मुंबई : वेस्टइंडीजचा फास्ट बॉलर टीनू बेस्टने त्याच्या एका पुस्तकात धक्कादायक खुलासा केला आहे. टीनूने म्हटलं आहे की त्याने आतापर्यंत ५०० ते ६५० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. त्याने स्वत:ला पुरुष वेश्या म्हटलं आहे. टीनू म्हणतो की, त्याची पहिली पत्नी मेलिसासोबत संबंध मोडल्यानंतर त्याने अनेक महिलांसोबत संबंध बनवले. माइंड विथ विन्डोज या पुस्तकात त्याने हा खुलासा केला आहे, या महिन्यातच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. 


महिलांना डेट करणं : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीनू म्हणतो की 'मी महिलांवर प्रेम करतो आणि महिला माझ्यावर प्रेम करतात. तो आधी महिलांशी बोलायचा,' त्यांना डेटवर घेऊन जायचा आणि मग त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवायचा. असा खुलासा त्याने या पु्स्तकात केला आहे. त्याने आतापर्यंत जगभरात ५०० ते ६५० महिलांसोबत सेक्स केल्याचा दावा केला आहे. 


स्वत:ला म्हटलं पुरुष वेश्या


टीनू हा आठवड्याभरात ५ ते ६ महिलांसोबत डेट करायचा. टीनू म्हणतो की 'मी कधीही कोणत्याही महिलेसोबत खोटं बोललो नाही. त्याला रिलेशनशिपमध्ये राहयचं नसून फक्त मजा करायची आहे असं तो प्रत्येकाला सांगायचा. आता कोणासोबत रिलेशनशिप होणारच नाही तर मग हे सांगण्यात कोणत्याही गोष्टीचं भय नाही.'