...आणि धोनीचा पारा चढला
टी-२० वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय मिळवला. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकेल अशी अनिश्चितता होती. कधी विजयाचे पारडे भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.
बंगळूरु : टी-२० वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय मिळवला. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकेल अशी अनिश्चितता होती. कधी विजयाचे पारडे भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.
अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या त्या चेंडूत धोनीने मुस्तफिझुरला रनआऊट केले आणि भारताचा रोमांचकारक विजय झाला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारने धोनीला विचारले, या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज होती. मात्र एक धावेने विजय झाला. संघाच्या कामगिरीवर तुम्ही किती संतुष्ट आहात.
यावर उत्तर देताना तुम्हाला भारताच्या विजयाने आनंद झालेला दिसत नाहीये. क्रिकेट म्हणजे स्क्रिप्ट नव्हे. सामन्याप्रमाणे रणनीती बदलावी लागते. तुम्ही बाहेर बसून रणनीती ठरवू शकत नाही, अशा शब्दात धोनीने उत्तर दिले.