ढाका : काही दिवसांपूर्वीच अंडर १९ वर्ल्डकप बांगलादेशात पार पडला. या स्पर्धेदरम्यान भारत वि न्यूझीलंड सामन्यादरम्यान एक अनपेक्षित पाहुणा क्रिकेटच्या मैदानावर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळताना दोन्ही संघातील खेळाडू तसेच अंपायरव्यतिरिक्त कोणालाही मैदानात येण्याची परवानगी नसते. मात्र हा पाहुणा अचानक आला. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क एक बेडूक होता.


बेडुक पाहुणा अवतरल्यानंतर कॅमेऱ्याचे डोळेही त्याच्याकडे वळले. या पाहुण्याला बाहेर हिसकावण्याचा प्रयत्न अनेकदा झाला मात्र काही केल्या हा बेडूक मैदानाबाहेर जायला तयार नव्हता.


याचा धमाकेदार व्हिडीओ पाहा