इंदूर : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला 3-0ने व्हाईटवॉश दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूर येथील अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने डबल सेंच्युरी झळकावली. या सामन्यात विराटच्या दमदार खेळीने सर्वत्र त्याचे कौतुक झालेच. मात्र त्याचबरोबर या सामन्यात विराटसारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती पाहून अनेक क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाले.


विराटसारखा हुबेहूब दिसणारा व्यक्ती यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्यावेळी चाहत्यांनी तर अक्षरश; त्याला विराट समजून त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. 


हे सर्व पाहून ड्रेंसिंग रुममध्ये बसलेला खराखुरा विराटला मात्र हसू आवरत नव्हते. आपली कार्बन कॉपी पाहून तोही हसू लागला.