कानपूर :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कानपूर टी -२० मध्ये सलामीवीर म्हणून आपल्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. आपल्या या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या टीमचे संतुलन करण्यासाठी ओपनिंगला आलो. युवा लोकेश राहुलने आपले सातत्य काम ठेवणे गरजेचे आहे असेही त्याने यावेळी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ निर्धारित षटकांच्या सामन्यात सलामीवीरांच्या जोडीच्या अपयशामुळे चिंतीत होता. शिखर धवनचा खराब फॉर्म आणि राहुलला न गवसलेला सूर यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. 


कोहली म्हणाला, मी आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून आलो आहे. ती पण टी-२० स्पर्धा आहे. त्यामुळे सलामीला खेळणे मला माहिती आहे. त्यामुळे मी ओपनिंगला आलो. मी काही तरी खास करून दाखवले यासाठी गेलो नव्हतो. 


मी ओपनिंगला गेल्याने संघाला अधिक संतुलन मिळाले.