धर्मशाला : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशालामध्ये पार पडलेल्या चौथ्या मॅचमध्ये भारतानं आपला विजय निश्चित केला... आणि भारतीय फॅन्सनं एकच जल्लोष केला... धर्मशाला टेस्ट जिंकण्यासोबत भारतानं सीरिजवरही ताबा मिळवलाय. उल्लेखनीय म्हणजे, या निमित्तानं या सीरिजचा कप एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनी हातात घेतलेला पाहायला मिळाला. 


दोन कॅप्टन्सचं नेतृत्व... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियावर २-१ अशा फरकानं विजय मिळवला. सीरिजमध्ये एक वेगळा रेकॉर्डही बनला. भारतानं टेस्ट सीरिज दोन कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली जिंकलीय. सुरुवातीच्या तीन टेस्टमध्ये विराट कोहली भारताचा कॅप्टन होता... परंतु, दुखापतीमुळे त्याला शेवटची टेस्ट खेळता आली नाही... त्यामुळे कॅप्टन्सीची संधी अजिंक्य रहाणेला मिळाली... आणि भारतानं या शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवला. या मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून पछाडलं. 


...तो ऐतिहासिक क्षण!


सीरिजमधल्या विजयाचा कप घेण्यासाठी दोन्ही कॅप्टन्सना मैदानात पाचारण करण्यात आलं... विजयाची ट्रॉफी दोन्ही कॅप्टन्सनी मोठ्या आनंदानं एकत्र हातात घेतली... गंमत म्हणजे, ज्यांच्या हातातून हा कप विराट - अजिंक्यनं स्वीकारला तोही भारताचा एक माजी कॅप्टन होता. हा कप सुनील गावसकर यांनी विराट - अजिंक्यकडे सोपवला... 


हा भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच एक ऐतिहासिक आणि आनंदी क्षण ठरला... टीम इंडियाच्या विजयाचा कप वेगवेगळ्या वेळी कॅप्टन्सीची धुरा स्वीकारणाऱ्या तीन भारतीय कॅप्टन्सच्या हातात होता.