कानपूर :  कानपूरवासियांना सुल्तान चित्रपटाचा रिमेक पहायला मिळाला. कारण कानपूरमध्ये जागेश्वर आखाड्यात एका महिला कुस्ती खेळाडूनं पुरुष कुस्ती खेळाडूला आव्हान देत त्याला चितपट केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुल्तान चित्रपटातही अनुष्का अशीच पुरुष पैहलवानांना आव्हान देत त्यांना चित करते. झाँसीची रेनू नाव असलेल्या या महिला कुस्ती खेळाडूनं अलाहबादच्या महेंद्र या पैहलवानाला आव्हान देत असेच चित केले. २५० वर्षांच्या इतिहासात अशी पहिलच घटना घडली आहे. केवळ ७ मिनिटात रेनूने महेंद्रला लोळवले. गेली ५ वर्षांपासून रेनू कुस्तीचे डाव शिकत आहेत.


 रेनू आणि महेंद्र यांच्यातील कुस्ती पाहण्यासाठी जवळपास दहा हजार नागरिकांनी गर्दी केली होती. रेनू आणि महेंद्रमधील सामन्यात तीन राऊंड झाले. सुल्तानमधील आरफासारखचं रेनूनं महेंद्रला अखेरच्या राऊंडमध्ये असा काही डाव टाकला की महेंद्र चितपट झाला. हा डाव जिंकल्यानंतर रेनूनं आपल्याला सुल्तानमधील अनुष्काची भूमिकेतूनच प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.