रिओ दी जानिरो : मेन्स हॉकीबरोबरच भारताच्या वुमेन्स हॉकी टीमला पराभवचा सामना करावा लागला. ग्रेट ब्रिटननं भारताचा 3-0 नं धुव्वा उडवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुस-या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटननं झटपट दोन गोल झळकावत आपली आघाडी कायम ठेवली. त्याचप्रमाणे चौथ्या व्क्वार्टरमध्ये भारतीय वुमेन्स टीमला पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये करण्यात अपयश आलं. 


या पराभवामुळे वुमेन्स हॉकी टीम ग्रुप 'बी'मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहचली आहे. आता भारताचा पुढचा मुकाबला हा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.