कोलकाता : टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले आणि आपणच जगज्जेते असल्याचे दाखवून दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपसाठी भारतात आलेल्या वेस्च इंडिज संघाकडे जर्सीही नव्हते. त्यांच्या बोर्डाने त्यांना योग्य ती मदतही केली नाही. वर्ल्डकपपूर्वी वेस्ट इंडिज जगज्जेता होईल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र संघकामगिरीच्या जोरावर त्यांनी जे यश मिळवलेय ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. 


इतक्यावरच वेस्ट इंडिज थांबला नाही तर वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम त्यांनी कोलकातामधील मदर तेरेसा मशीनरीला देणगी म्हणून देत एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला.