नवी दिल्ली : प्रति मिनिट कमाई करणाऱ्यांमध्ये कोणता भारतीय खेळाडू अव्वल आहे? यावर तुमचे उत्तर असेल सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी. मात्र प्रति मिनिट सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी कोणताही भारतीय क्रिकेटपटू नाही तर कुस्तीपटू योगेश्वर दत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर इनसाइटने भारतात होणाऱ्या खेळांच्या लीगमधून मिळणाऱ्या वेतनाबाबतच्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिलीय. भारतात चालवल्या जाणाऱ्या आठ लीगमधील खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाची यामध्ये माहिती देण्यात आलीये. यात आयपीएल, हॉकी इंडिया लीग, प्रीमियर बॅडमिंटन लीग, प्रो कबड्डी लीग, प्रो कुस्ती लीग, इंडियन सुपर लीग, इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग आणि चॅम्पियन्स टेनिस लीग यांचा समावेश आहे.


रिपोर्टनुसार कुस्तीपटू योगेश्वर दत्तची प्रति मिनिट कमाई १.६५ लाख रुपये इतकी आहे. जागतिक क्रमवारीत योगेश्वर सातव्या स्थानी आहे. या यादीत भारताचा ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज सिंग १.१ लाख प्रति मिनिट कमाईसह १७व्या स्थानी आहे. कसोटी कर्णधार विराट कोहली २९व्या, वनडे कर्णधार एमएस धोनी ३४व्या तर सुरेश रैना ४८व्या स्थानी आहे.