`देशात कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे`
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता.
मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता.
सुल्तानच्या प्रमोशनसाठी सलमानला रिओ ऑलिम्पिकचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवण्यात आल्याची टीका योगेश्वरनं केली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर सलमानच्या फॅन्सनी योगेश्वर दत्तवर जहरी टीका केली होती. योगेश्वरचा सगळा वेळ सलमानवर टीका करण्यातच गेला, त्यामुळे त्याला मेडल मिळालं नाही, अशा आणि यासारख्या काही आक्षेपार्ह टीका योगेश्वरवर करण्यात आल्या होत्या.
या टीकेला योगेश्वर दत्तनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या देशामध्ये कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे, असं योगेश्वर दत्त म्हणाला आहे. हे सांगतानाच त्यानं रिओमधल्या निराशाजनक कामगिरीबद्दल देशवासियांची माफीही मागितली आहे.
पाहा काय म्हणाला योगेश्वर दत्त