धोनीनं कर्णधारपद सोडल्यावर युवीचं कमबॅक पण ट्रेण्ड योगराजचा
भारताच्या वनडे आणि टी 20 टीममध्ये युवराज सिंगनं कमबॅक केलं आहे. 15 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये युवराज मैदानात दिसेल.
मुंबई : भारताच्या वनडे आणि टी 20 टीममध्ये युवराज सिंगनं कमबॅक केलं आहे. 15 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये युवराज मैदानात दिसेल.
तब्बल तीन वर्षांनंतर युवराज वनडे टीमचा हिस्सा असणार आहे.युवराज सिंगनं टीममध्ये कमबॅक केलं असलं तरी सोशल नेटवर्किंगवर मात्र युवराजचे वडिल योगराज सिंग ट्रेण्डिंगमध्ये आले आहेत.
युवराज सिंगची टीममध्ये निवड न होण्यामागे कॅप्टन धोनीचा हात असल्याचे आरोप योगराज सिंगनी वारंवार केले होते. धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीकडे टीमचं नेतृत्व आलं आणि लगेचच युवराजचं टीममध्ये कमबॅक झालं, यामुळे योगराज सिंग यांचा ट्रेण्ड सुरु झाला आहे.