रिओमध्ये चोरांचा उच्छाद
खेळांचा सर्वात मोठा कुंभमेळा यंदा ब्राझीलच्या रिओ शहरात भरला आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे. या ऑलिम्पिकचा फायदा येथील भुरट्या चोरांनाही झाला आहे.
रिओ द जिनेरो : खेळांचा सर्वात मोठा कुंभमेळा यंदा ब्राझीलच्या रिओ शहरात भरला आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे. या ऑलिम्पिकचा फायदा येथील भुरट्या चोरांनाही झाला आहे.
व्हिडिओ सर्वात खाली दिला आहे..
रस्त्यावरून फिरणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या हातातील महागड्या वस्तू हिसकावून पळण्याचे प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरट्यांचा इतका उच्छाद की त्यांना कायद्याचा किंवा पोलिसांचा कोणताही धाक नाही.
परदेशी पर्यटकांना हे लूटत आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. या व्हिडिओमुळे ब्राझीलची प्रतिमा डागळत आहे.
पाहा हा धक्कादायक व्हिडिओ...