मीरपूर : भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये झालेल्या आशिया कप फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये एक वेगळा रोमांचं होता, मात्र खेळाडूंमध्ये हॉटेलमध्ये चांगलं ताळमेळ होतं. हॉटेलमध्ये शकीब अल हसन आणि सलामीवीर सौम्य सरकारमध्ये चांगली चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौम्य सरकार हा युवराजचा आधीपासून फॅन आहे, त्याला युवराजला भेटायचं होतं, बोलायचं होतं, तेव्हा ते त्याने शकीब अल हसनला सांगितलं, शकीबने ते युवराजला सांगितलं, युवराजने सौम्यला बोलावून घेतलं आणि त्याला आपली सही असलेला टी-शर्ट गिफ्ट केला तसेच तू पाकिस्तान विरूद्ध विजयी खेळी खेळला, ते आपण पाहिलं, खूप चांगला खेळलास असंही युवराजने त्याला सांगितलं.


युवराज दोन वर्ष क्रिकेटपासून दूर होता, तेव्हा आपल्याला वाईट वाटलं असं देखील सौम्यने यावेळी सांगितलं, आपण भारताच्या बॉर्डरच्या एवढ्या जवळ राहतो की चालत भारतात पोहचू शकतो, असंही सौम्यने यावेळेस सांगितलं.