नवी दिल्ली : धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळेच युवराज सिंगचं कमबॅक झाल्याची प्रतिक्रिया युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी दिली आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी ही आगपाखड केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगची टीममध्ये निवड न होण्यामागे कॅप्टन धोनीचा हात असल्याचे आरोप योगराज सिंगनी वारंवार केले होते. तब्बल तीन वर्षांनंतर युवराज वनडे टीमचा हिस्सा असणार आहे. युवराज अखेरची वनडे ११ डिसेंबर २०१३मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. गेल्या वर्षी २७ मार्चला मोहालीमध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खेळला होता.


युवराजने यंदाच्या रणजी मोसमात पंजाबकडून खेळताना ५ सामन्यात ६७२ धावा केल्या. त्यानंतर मात्र तो खेळला नव्हता. नुकतेच त्याचे हेझल कीचसोबत लग्न झाले. युवराजच्या रणजीमधील कामगिरी पाहता त्याची इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी निवड करण्यात आलीये.