मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोहलीचं अशी तोंडभरून स्तुती होत असताना युवराज सिंग मात्र कोहलीबाबतच्या एका प्रश्नावर चांगलाच भडकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कॅप्टन होण्यासाठी विराट कोहलीचं नाव चर्चेत आहे, याबाबत तुला काय वाटतं असा प्रश्न युवराजला विचारण्यात आला. या प्रश्नाचा युवराजला राग आला. मी इकडे वेगळ्या कार्यक्रमाला आलो आहे, क्रिकेटच्या गोष्टी करायला नाही असं उत्तर युवराजनं दिलं आणि तिकडून तो निघून गेला. 


विराट कोहली फाऊंडेशनच्या मुंबईतल्या एका कार्यक्रमात युवराज सिंग आला होता. तेव्हा त्याला हा प्रश्न विचारण्यात आला, पण तो युवराजला रुचला नाही.