मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये अभिनेत्री हेजल कीथसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.


लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही पण एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये युवराजचा साखरपुडा झाला असून या वर्षाच्या शेवटी तो विवाहबंधनात अडकणार आहे. हिंदु आणि सीख अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.