विशाखापट्टणम : आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही


मैदानावर काय झाले होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाखापट्टणम येथे रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात हैदराबादने मुंबईला ८५ धावांनी हरवले. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत असताना युवराज सचिनजवळ आला त्याच्या पाया पडला. युवराजच्या या कृतीने सचिनही थोडा गोंधळला. 


याआधीही घडले होते हे


याआधीही जुलै २०१४मध्ये लॉर्डच्या बायसेंटेनरी सेलिब्रेशन सामन्यात युवराज सिंगने रेस्ट ऑफ द वर्ल्ड कडून खेळताना १३४ चेंडूत १३२ धावा केल्या होत्या. मात्र सचिनच्या बॉलवर युवराज बाद झाला. क्रीझ सोडताना युवराजने सचिनच्या पायांना स्पर्श केला. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्येही दिल्लीच्या एका सामन्यादरम्यान युवराज सचिनच्या पाया पडला होता.