मुंबई : टाटाची नॅनो कार आता एका नव्या लूकमध्ये अवतरणार आहे.. सर्वसामान्यांची आवडती ही नॅनो हॅचबॅक टियागोशी मिळती-जुळती आहे असे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा कंपनीने सर्वांत स्वस्त नॅनो कार बाजारात आणून अनेकांची कार घेण्याची स्वप्ने पूर्ण केली. आता ही गाडी नव्या लूकमध्ये अधिक आकर्षक स्वरूपात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.


ही कार बाजारात 'पेलिकन' या नावाने लाँच होणार आहे. या नव्या नॅनोमध्ये आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. यामध्ये टियागो कारसारखे डॅशबोर्ड वापरण्यात आले आहे. तसेच 3 सिलेंडरचे इंजिन, स्टेअरिंग व्हीलवर ऑडियो आणि टेलीफोन कंट्रोल, टचस्क्रीन, यांसारखेच अनेक बदल करण्यात आले आहेत.