५ जी तंत्रज्ञानाने भारत आणि अमेरिकेचे वाजणार बारा
जग तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत आहे. सध्याच्या युगात बहूतेक जण स्मार्ट फोनमध्ये 3जी, 4जी इंटरनेटचा वापर करतात. या 3जी, 4जी नंतर 5जी इंटरनेटमुळे भारत आणि अमेरिकेच्या नाकी नऊ येणार आहे, कारण येत्या काळात या दोन देशांतून सर्वात जास्त इंटरनेट ग्राहक असणार आहेत. त्यामुळे ५ जीचा स्पीड देतांना दोन्ही देशांची दमछाक होणार आहे.
लंडन : जग तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत आहे. सध्याच्या युगात बहूतेक जण स्मार्ट फोनमध्ये 3जी, 4जी इंटरनेटचा वापर करतात. या 3जी, 4जी नंतर 5जी इंटरनेटमुळे भारत आणि अमेरिकेच्या नाकी नऊ येणार आहे, कारण येत्या काळात या दोन देशांतून सर्वात जास्त इंटरनेट ग्राहक असणार आहेत. त्यामुळे ५ जीचा स्पीड देतांना दोन्ही देशांची दमछाक होणार आहे.
जागतिक अभ्यासानुसार, सध्या भारतात 105 कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. तसेच 90% इंटरनेट ग्राहक 3जी 4जी इंटरनेटचा वापर करतायत, प्रतिवर्षी 04 पटीने इंटरनेट ग्राहक वाढत आहेत, यावर्षाच्या शेवटपर्यंत जगभरात 360 कोटी इंटरनेट ग्राहक वाढणार आहेत.
2016 मध्ये भारतात 1.5 कोटी, चीनमध्ये 1.4 कोटी, इंडोनेशियात 60 लाख, म्यानमार आणि फिलीस्पमध्ये 40 लाख इंटरनेट ग्राहकांची संख्या आहे.
2022 पर्यंत इंटरनेटवर 48 टक्के व्हिडियो, 38 टक्के टेक्स्ट, तसेच 22 टक्के ऑडिओच्या माहितीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर जगात सध्या अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलॅंड, जपान, चीन, नार्वे, इटली, फ्रान्स हे देश इंटरनेट स्पीडमध्ये अव्वल आहेत.
येत्या काळात 2022 पर्यंत 55 कोटी इंटरनेट ग्राहकांची भर पडणार आहे. त्यात भारत आणि अमेरिका देशातील ग्राहकांची संख्या जास्त असणार आहे.