ठाण्यात महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू
![ठाण्यात महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू ठाण्यात महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/02/07/170057-path-hole.jpg?itok=x5ImsM2B)
ठाणे कारागृहाजवळील संरक्षण भिंतीलगत असलेल्या फुटपाथचा काही भाग खचल्याने एका महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय. जमिला अनिस खान असं महिलेचं नाव असून त्या मुळच्या ठाण्यातील राबोडी येथील क्रांतीनगरच्या रहिवासी आहेत.
ठाणे : ठाणे कारागृहाजवळील संरक्षण भिंतीलगत असलेल्या फुटपाथचा काही भाग खचल्याने एका महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय. जमिला अनिस खान असं महिलेचं नाव असून त्या मुळच्या ठाण्यातील राबोडी येथील क्रांतीनगरच्या रहिवासी आहेत.
रात्री जमिला आपल्या पती आणि ३ मुलांसोबत घरी जात असताना अचानक त्यांच्या पायाखालच्या फुटपाथचा भाग खचला आणि त्या १५ फूट खोल खड्ड्यात पडल्या. या खड्ड्यात प्रचंड गाळ अल्यानं त्या गाळात रुतल्या आणि त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आले असतानाही त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे स्थानिकांनीच खड्ड्यात उतरुन जमिला यांच शव बाहेर काढलं. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच जमिला यांचा जीव गेल्याची तक्रार स्थानिकांनी केलीये.