नवी दिल्ली :  नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती काही काळासाठी मंद होईल. त्यामुळे होणाऱ्या त्रासातून गरिबांची सुटका करण्यासाठी सरकारनं खूप काळजी घेतली पाहिजे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती भवनातून सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना राष्ट्रपतींनी हे विधान केलंय. काळा पैसा थांबवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी करण्यात आलेल्या नोटाबंदीचे परिणाम कमी होण्यास वेळ लागेल, मात्र गरीबांकडे इतका वेळ असेल का, याबाबत राष्ट्रपतींनी शंका व्यक्त केली.


त्यांना होणारा त्रास कमी झाला तरच ते गरीबी-बेरोजगारीच्या विरोधात सुरू झालेल्या या मोहीमेत सहभाही होऊ शकतील, असंही राष्ट्रपती म्हणालेत.