नवी दिल्ली : दरवर्षी अर्थसंकल्पाआधी आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात येतं. आर्थिक सर्वेक्षण अर्थसंकल्पाची दिशा ठरवते. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' ही संकल्पना मांडण्यात आलीय. ही संकल्पना तशी आपल्या देशात नवी आहे.


पण,  'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' ही संकल्पना नेमकी आहे तरी काय... जाणून घेऊयात... 


युनिव्हर्सल बेसिक इन्कम


- यूबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम अर्थात सार्वत्रिक कमीत कमी उत्पन्न... 


- या योजनेंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्नाची हमी सरकारतर्फे देण्यात येते


- या नागरिकाला हाताला काम असो की नसो प्रत्येकाला उत्पन्नाची हमी मिळते


- भारतातल्या दारिद्र्य रेषेखालच्या नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे


- देशात साधारण: 27 कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल


- देशाच्या तिजोरीवर दरवर्षी साधारण: 3.24 लाख कोटींचा बोजा पडेल


- 2016-17 आर्थिक वर्षात सबसिडीवर अडीच लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित


- त्यापैंकी अन्न सुरक्षेसाठी 1.34 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे


- खतांच्या अनुदानासाठी 70 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे


- कच्च्या तेलाच्या खरेदीवर 26 हजार 947 कोटी रुपये खर्च होणार आहेत


- यूबीआय आणि सबसिडीची तुलना केल्यावर थेट खात्यात पैसे देण्याचा निर्णय होईल