लंडन : आजच्या इंटरनेट आणि डीजिटल युगात पॉर्न पाहणे सहज शक्य होते. महिलाही आवडीने पॉर्न पाहतात. एका नव्या संशोधनात पुढे आलेय की, महिला आठवड्यात किमान एकदा तरी पॉर्न सिनेमे पाहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमधील अग्रणी वृत्तपत्र 'द इंडिपेंडेंट'च्या नुसार आंतरराष्ट्रीय महिला पत्रिका 'मॅरी क्लेअर'साठी स्पेनमध्ये हे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 'टाईपफोर्म'ने केले. ३,००० महिलांपैकी ९० टक्के ऑनलाईन आणि दोन तृतीयांश महिला या आपल्या फोनवर पॉर्न पाहतात, असे पुढे आले.


३१ टक्के महिलांनी सांगितले, आम्ही दर आठवड्याला पॉर्न पाहतो. तर ३० टक्के महिलांनी सांगितले, महिन्यातून कधीतरी एकदा पॉर्न फिल्म पाहतो. हे सर्वेक्षण करताना एक प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्ही कोणत्या प्रकारच्या पॉर्न पाहता? त्यावेळी ६३ टक्के महिलांनी सांगितले 'हेट्रोसेक्सुअल', ४४ टक्के महिलांनी सांगितले, लेस्बियन तर ३१ टक्के महिलांनी सांगितले दोन्ही प्रकारचे पॉर्न पाहतो. तर १३ टक्के स्पष्ट केले, 'गे मेल पॉर्न' पाहणे पसंद करतो.


या सर्व्हेत समजले की, महिला या एकट्यानेच पॉर्न पाहण्याचा आनंद लुटतात. तर दोन तृतीयांश महिलांना सांगितले, आम्ही आमच्या जोडीदारासोबत पॉर्न पाहणे पसंत करीत नाही. पॉर्न पाहणे हा 'यौन जीवन'चा एक सकारात्मक प्रभाव आहे, याबाबत सहमती दर्शविली. या सर्व्हेत १८ ते ३४ वयोगटातील महिलांचा समावेश दिसून आला.