बीजिंग : भारतात महिलांना प्रसूती रजा सहा महिण्याची करण्यात आलेय. आता तर चीनमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळावधीत रजा देण्याची सहमती दर्शविण्यात आलेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांना मासिक पाळी आल्यास किंवा मासिक पाळीमुळे त्रास होत असल्यास कार्यालयात काम करणे कठिण जाते. किंवा त्रास असताना निमूटपणे काम करावे लागते. महिलांना दर महिन्याला होणाऱ्या या त्रासातून दिलासा मिळावा यासाठी महिलांना मासिक पाळीवेळी रजा देण्यासंबंधी चीनच्या एका प्रांतात सहमती दर्शविली आहे.


 


मासिक पाळी आल्यास ऑफिसात येण्याची गरज नसून केवळ हॉस्पिटलचे प्रमाणपत्र दाखवल्यास महिलांना भर पगारी रजा मंजूर करण्यात येणार आहे. चीनच्या China.org या न्यूज संकेतस्थळाने तशी माहिती दिलेय. चीनमधील एका प्रांतात महिलांना मासिक पाळीवेळी रजेची सुविधा देण्यात आली आहे. 


महिलांना अशाप्रकारे सुविधा देणारा हा काही एकमेव प्रांत नाही. याआधी उत्तरी शक्ची आणि सेंट्रल हुबे या प्रांतात अशी सुविधा देण्यात आलेय. चीनमध्ये देण्यात येत असलेली ही सुविधा दक्षिण कोरिया, तायवान, इंडोनेशिया आणि जपान या देशांतही देण्यात येते. 


जपानमध्ये १९४७ मध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. जपानमधील नाईकी ही जगातील पहिली कंपनी आहे की तिने महिलांना ही सुविधा सर्वात आधी दिली. तर तायवानमध्ये प्रत्येक वर्षी मासिक पाळीतील पीडित महिलेच्या तीन सुट्या मंजूर केल्या जातात.