फिनलँड : वयाच्या दहाव्या वर्षी एक चिमुरडा जवळपास साडे सहा लाखांचा मालक बनलाय... इन्स्टाग्रामनं या चिमुरड्याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिलीय. 


कशासाठी मिळालं बक्षीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिनलँडला राहणाऱ्या जेनला फेसबुकचं फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामनं एका 'बग' (त्रुटी) शोधून काढण्यासाठी 10,000 डॉलर म्हणेजच जवळपास 6.65 लाख रुपयांचं बक्षीस दिलंय. 


काय होती त्रुट


उल्लेखनीय म्हणजे, इन्स्टाग्रामवर अकाऊंट बनवण्यासाठी कमीत कमी वय 13 वर्ष असायला हवं... पण, जेन मात्र अवघ्या 10 वर्षांचा आहे. इन्स्टाग्राममध्ये एक अशी त्रुट राहिली होती ज्यामुळे युजर्स दुसऱ्या एखाद्या युजर्सच्या अकाऊंटवरच्या कमेंटही डिलीट करू शकत होते... मग तो जस्टीन बीबर असो किंवा अमिताभ बच्चन... 


काय करणार या पैशांचं...


फेब्रुवारी महिन्यात ही गोष्ट समोर आली होती. हेलसिंकीमध्ये राहणाऱ्या या मुलानं आपण या बक्षीसाच्या रकमेतून बाईक, फुटबॉलचं सामान आणि आपल्या भावांसाठी कम्प्युटर खरेदी करणार असल्याचं म्हटलंय.