पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे. 


विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून प्रमाणपत्राच्या प्रती साक्षांकित करुन अर्ज स्वीकृती केंद्रावर सादर करायचे आहे. www.cap11ngp.org या वेबसाईटवर अधिक माहिती मिळवू शकता.