ओरेम, उटाह : अमेरिकेतील उटाहमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानं आपल्या जुळ्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले... आणि त्याला सुखरुप बाहरेही काढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन चिमुरड्यांचा हा ढासू व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  


दोन मिनिटांच्या या व्हिडिओत दोन्ही भाऊ एका ड्रेसर टेबलवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत... परंतु, या प्रयत्नात हा टेबल सरकला... आणि दोन्ही भावांच्या अंगावर कोसळला... एक भाऊ या टेबलच्या ड्रॉवरमध्ये अडकून राहिला... त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या चिमुरड्यानं काय काय केलं... आणि आपल्या जुळ्या भावाला कसं सुखरुप बाहेर काढलं... हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओच पाहावा लागेल...  


या मुलांचे वडिल रिकी शॉफ यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केलाय. आपले दोन्ही मुलं सुखरुप असल्याचं त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय.