२० पानांचा भन्नाट रिज्युम, इंटरव्हयू न घेताच मिळाला जॉब
आजच्या स्पर्धेच्या युगात चांगला जॉब मिळवणं जरा कठिणच आहे. तुमचा रिज्यूमवर बरंच काही अवलंबून असतं. पण तुम्ही कधी २० पानांचा बायोडेटा पाहिला नसेल. तुम्हाला हा खूपच मोठा वाटत असला तरी एका युवकाला याच रिज्यूममुळे इंटरव्ह्युव न घेता जॉब मिळाला आहे. पाहा काय आहे या रिज्युमची खासियत.
मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात चांगला जॉब मिळवणं जरा कठिणच आहे. तुमचा रिज्यूमवर बरंच काही अवलंबून असतं. पण तुम्ही कधी २० पानांचा बायोडेटा पाहिला नसेल. तुम्हाला हा खूपच मोठा वाटत असला तरी एका युवकाला याच रिज्यूममुळे इंटरव्ह्युव न घेता जॉब मिळाला आहे. पाहा काय आहे या रिज्युमची खासियत.
सुमुख मेहताने एमबीए केलं आहे आणि त्याने जवळपास १६० रिज्यूम बनवले आहे. पण त्याने जेव्हा तेव्हा तो काहीतरी अनोखाच होता. त्याने प्रेस्टिजियस जीक्यू मॅग्जीनमध्ये मार्केटिंग हेडच्या पोस्टसाठी अप्लाय केलं. त्याचा या रिज्युममध्ये त्याने २० पानांवर त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या २० खास गोष्टी त्याने दाखवल्या.
या रिज्यूममध्ये फोटो शूट्स, ग्राफिक डिजाइन आणि कंटेंट रायटरचा समावेश करत त्याने त्याचा रिज्युम एका मॅगजिन सारखाच बनवला. त्याची ही भन्नाट आयडिया जीक्यू मॅगजिनचे ब्रिटिश एडिटर-इन-चीफ यांना इतकी आवडली की त्यांनी त्याला इंटरव्ह्यु न घेताच जॉब ऑफर केली.