मुंबई : तुम्हाला ४ जी स्मार्टफोन विकत घ्यायचाय. मात्र तुमच्या बजेटमध्ये बसत नाहीये. तर आता नो टेन्शन. तुमच्या खिशाला परवडणारा ४जी स्मार्टफोन लवकरच येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या प्रोसेसर बनवणाऱ्या स्पेडट्रम कंपनी लवकरच अवघ्या १५०० रुपयांत नवा ४जी हँडसेट लाँच कऱणार आहे. स्प्रेडट्रम कम्युनिकेशन इंडियाचे प्रमुख नीरज शर्मा यांनी एका ईटीला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अशा टेक्नॉलॉजीवर काम करत आहोत ज्यामुळे बाजारात १५०० रुपयांमध्ये ४जीचे हँडसेट उपलब्ध होऊ शकतात. 


रिलायन्स जिओ आल्यानंतर भारतीय बाजारात ४जी स्मार्टफोनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीये. यामुळे अनेक कंपन्या बाजारात स्वस्त ४जी स्मार्टफोन आणतायत. 


नुकताच लावा कंपनीने बाजारात ३,३३३ रुपयांमध्ये ४ जी स्मार्टफोनची घोषणा केली.