आजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!
बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग `अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर` अशी पाटी दिसते...
मुंबई : बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते...
तुमचा प्रेमावर अतुट विश्वास असेल... पण, तरीही अजून तुम्हाला अजून परफेक्ट लाईफ पार्टनर मिळाला नसेल... तर तुम्ही या गोष्टी पडताळून पाहू शकता.
लव्ह, अफेअर आणि ब्रेकअपचा ट्रेन्ड सध्या बॉलिवूडमध्येच नाही तर सार्वत्रिकरित्या लोकप्रिय होताना दिसतोय. यामधून एखादा आयुष्याचा जोडीदार शोधणं थोडं कठिणच... यामागेही कदाचित काही कारण असतातच ना... पाहा, यापैंकी कुठलं कारण तुम्हाला जवळचं वाटतंय का?
धैर्य, सहनशीलता, पेशन्स नावाची गोष्ट हरवतेय
जिथे पिझ्झा घरपोच मिळण्यासाठी ३० मिनिटांचा दावा केला जातो... केवळ १५ दिवसांत वजन कमी करा असं लिहिलेले बोर्ड आपण पाहत बसतो... अशा वेळी आपल्या जोडीदाराला, आपल्या नात्याला समजून घ्यायला कदाचित आपले पेशन्स कमी पडत असतील...
धैर्य राखा, परिस्थिती समजून घ्या... आणि मग थंड डोक्यानं समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
परिस्थितीसमोर लगेचच हात टेकणे
आपल्याला लहानपणापासून नेहमी जिंकणंच शिकवलं गेलं असतं... पण, हरल्यानंतर तो 'पराजय'ही कसा सेलिब्रेट करायचा हे मात्र शिकवलं जात नाही... किंवा थोडा आत्मविश्वास कमी असेल तरीही आपण लगेचच खडतर परिस्थितीसमोर हात टेकतो... मग, ते कोणत्याही गोष्टीत असो...
त्यामुळे, स्वत:वर विश्वास ठेवा... धैर्य राखा... आणि आपल्या मार्गावर वाटचाल करत राहा... उशीरा का होईना तुमच्या हाताला यश जरूर लागेल...ही गोष्ट नात्यासाठीही किती परफेक्ट आहे ना...
बचनबद्धतेची भीती, जबाबदारी नको...
आजच्या पीढीच्या मनता बहुतेकदा 'फिअर ऑफ कमिटमेंट' आढळते... त्यांना कुठल्या वचनात, शब्दात अडकायचं नसतं... जबाबदारी नकोशी वाटते... आपण आयुष्यभर मुक्तपणे भरारी घेत राहावी असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे, बहुतेकदा ते आपल्या शब्दावर ठाम न राहता पाऊल मागे घेताना दिसतात.
पण, नात्याची हीच जबाबदारी आणि विश्वास तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो... मुक्तपणे भरारी घेत असताना आणखी एक हात हातात असेल तर जगण्याची मजाही काही औरच असते... त्यामुळे आपणच तयार केलेल्या कोशात स्वत:ला न अडकवता एक मुक्त भरारी घेऊन तर पाहा...
बिझी लाईफस्टाईल
एकाच वेळी स्वत:ला अनेक गोष्टींमध्ये अडकवून घेणं... त्यामुळे, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासाठी सोडा पण स्वत:साठीही वेळ न मिळणं... ही गोष्ट आजकाल नात्याला खूपच हानिकारक ठरतेय. आपलं संपूर्ण आयुष्यच घर आणि ऑफिसमध्ये अडकवून घेतलंत तर तुम्ही नवीन लोकांना भेटणार कधी... आणि कसं...? नवीन लोकांना नाही तरी तुम्ही तुमची जुनी नातीही यामुळे सांभाळू शकणार नाहीत.
एक म्हण आहे... एखादी बिझी व्यक्तीच आपल्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकते... खरोखरच स्वत:ला बिझी बनवा... पण, केवळ कामासाठी नाही तर आपल्या जवळच्या माणसांसाठीही...
मनातली दुविधा...
आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावणं ही गोष्ट तुमच्यासाठी खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकते... कदाचित तुमच्या डोक्यात आणि मनातील गोष्ट वेगळी असू शकते... त्यामुळे कोणतंही पाऊल उचलण्याअगोदर एकदा 'रिअॅलिटी चेक' जरूर करून पाहा... आणि एका दगडावर ठामपणे उभं राहा... तुम्ही जसं आहात तसं तुम्हाला स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करा.