मुंबई : मनुष्य आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक गोष्टींच्या आहारी गेला आहे. त्यामुळे तो नव्या आजारांना आमंत्रण देत आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ आणि मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. तर मग तुम्ही ही तपासून पाहा तुम्ही मोबाईल अॅडिक्ट तर नाहीत ना ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तपासून पाहा :


१. सलग थोडा वेळ मोबाईलवर मेसेज किंवा फोन न आल्यास नेटवर्क कनेक्‍शन तपासून पाहता?


२. आपला फोन सतत आपल्या हाती हवा, कुणाला तरी मेसेज करावा किंवा नविन मेसेज येत राहावेत असं वाटतं?


३. कामाची बैठक, विमान प्रवासादरम्यान मोबाईल वापरता न आल्यास अस्वस्थ वाटतं का ?


४. गाडी चालवताना फोन आला तर लगेचच त्याला उत्तर देण्याची घाई करता का ?


५. झोपण्यापूर्वीची शेवटची आणि जाग आल्यानंतरची पहिली कृती फोन पाहणे हीच असते?


६. एखाद्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी मोबाईलवरील अलार्मवर अवलंबून असता का ?


७. तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी मला फोन करावा आणि सतत फोन येणं सुरू असावं.


या सगळ्या ७ प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहात.