मुंबई : लग्न सोहळ्यामध्ये मेकअप ही फार महत्त्वाची गोष्ट असते. पण मेकअप केवळ नववधू किंवा मुलींसाठीच असतो असा तुम्ही विचार करत तर नवरदेवांनो ! पुन्हा विचार करा. पारंपारिक वेशात आणि आभुषणांनी सजलेली मुलगी जितकी मोहक दिसते तितकेच लक्ष नवर्‍या मुलानेदेखील स्वतःकडे देणे गरजेचे आहे. मग मुलांनो लग्नाच्या केवळ काही दिवस आधी स्वतःची काळजी न घेता पुरेसे प्लॅनिंग़ करा. केवळ दाढी आणि चेहर्‍याची काळजी न घेता स्वतःकडे थोडे विशेष लक्ष द्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. त्वचेची काळजी : प्रत्येक प्रकारच्या त्वचेला काळजी घेणे आवश्यक आहे. पुरेशी आणि योग्य काळजी घेतल्याने तुम्ही अधिक यंग दिसू शकता. तुम्हांला तुमच्या त्वचेचा प्रकार नेमका ओळखता आला तर त्याची काळजी घेणेदेखील सोपे होईल.


२. केस : केसांचा केअर कट केवळ आकर्षक ठेवणं पुरेसे नाही. मात्र त्याची देखभाल करणेदेखील गरजेचे आहे. तुमच्या स्टाईलनुसार दर 2-4 आठवड्यांनी सलोनमध्ये जा. आठवड्यातून किमान दर 2 दिवसांनी केस स्वच्छ धुवावेत.


३. भुवया : मुलींप्रमाणेच मुलांनीदेखील भुवयांची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांनी त्यांच्या भुवया खूप जाड असल्यास त्या वेळच्या वेळेस ट्रीम करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य तज्ञांकडून भुवया ट्रीम करून घ्याव्यात.


४. चेहरा : फेसवॉशचा वापर केवळ मुलींनी करावा असे नसते. अनेकदा मुलं चेहरा स्वच्छ करण्यासाठी नियमित साबणाचा वापर करा. परंतू साबणातील केमिकल्स चेहर्‍यावरील त्वचेचे नुकसान करू शकतात. चेहरा शुष्क बनवतात. तुमच्या त्वचेनुसार फेस क्लिन्जरचा वापर करा.


५. चेहरा केवळ स्वच्छ करणे पुरेसे नाही तर त्यानंतर मॉईश्चरायझरचा वापर करा. यामुळे शुष्कता कमी होते. तसेच फेसवॉश आणि मॉईश्चरमध्ये योग्य प्रमाणात SPF आहे याचीदेखील काळजी घ्या. त्यानुसारच तुमच्या प्रोडक्टची निवड करा.


६. फेशिअल हेअर - तुमच्या हेअर कट प्रमाणेच चेहर्‍यावरील केसांचीदेखील काळजी घेणं गरजेचे आहे. तुमच्या चेहर्‍याला आणि हेअरकट मिळतीजुळती दाढी-मिशांचीही स्टाईल निवडा. तसेच रुबाबदार दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय देखील जाणून घ्या.


७. हाता-पायाची बोटं आणि पाय - सौंदर्य जपण्यासोबत तुमच्या शरीराची स्वच्छता पाळणेदेखील गरजेचे आहे. दर तीन महिन्यांनी पायाचे पॅडिक्युकर करा.नखं वेळोवेळी कापा.