नवी दिल्ली : डिजिटल क्रांतीच्या या जमान्यात इंटरनेट आणि सोशल मीडिया तरुणांसाठी 'ऑक्सीजन'चं झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर तितकाच जहरीदेखील ठरतोय. सोशल मीडियावरून अनेकदा लोक आपले फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करतात. कधी कधी तर अशाही डिटेल्स सोशल मीडियावर शेअर केल्या जातात, ज्या आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतील. 


सोशल मीडियाचा हाच अयोग्य वापर अनेकदा असुरक्षितही ठरतो. यामुळेच तर सायबर क्राईममध्येही वाढ होतेय. 


परंतु, असं तुमच्याबाबतीत काही घडू नये, याची काळजी तुम्ही अगोदरपासूनच घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कराव्या लागतील या आठ छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी... 


१. सोशल मीडियावर तुमचा पासवर्ड मजबूत असायला हवा


२. हा पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका


३. सोशल मीडियावर अनावश्यक चर्चांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊ नका... एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद असतील तर समोरासमोर बसून सोडवून टाका.


४. आपले फोटो नेहमी खाजगी ठेवा


५. गुगलवर सर्च करताना योग्य पद्धतीनं सर्च कराव्या


६. सोशल मीडियावर अनोळखी लोकांसोबत मैत्री टाळा. आपल्या मित्र मंडळींची निवड योग्य पद्धतीनं करा.


७. तुमचं युझरनेम योग्य पद्धतीनं निवडा


८. आपल्या मित्रमंडळींबाबत नेहमी जागरुक राहा... त्यांच्याबद्दल माहिती ठेवा.