मुंबई : भारताच्या प्रतिष्ठित महाविद्यालयांपैंकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांबद्दल एक माहिती समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैंकी ९५ टक्के फ्रेशर्स 'व्हर्जिन' आहेत. इन्स्टिट्युटमध्ये प्रकाशित होणाऱ्या न्यूजपेपर 'इनसाईट'नं केलेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट उघड झालीय. 


३० टक्के विद्यार्थी नातेसंबंधात


जवळपास ३० टक्के मुलांनी आपण कुणाशी तरी रिलेशनशीपमध्ये असल्याचं कबूल केलं. परंतु, आपल्या नात्याची हद्द आपण कधीही ओलांडली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


सर्व्हेचा उद्देश काय?


या प्रतिष्ठीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. हे विद्यार्थी नातेसंबंध, देश आणि कॉलेजलाईफबद्दल काय विचार करतात, हे जाणून घेण्याचा या सर्व्हेचा उद्देश होता. 


समलैंगिक संबंधांबद्द काय विचार करतात?


सर्व्हेनुसार, जवळपास ७५ टक्के विद्यार्थी - विद्यार्थिनींचे समलैंगिक संबंधांबाबत विचार मोकळे आहेत. 


या सर्व्हेत जेईईच्या माध्यमातून या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या ८७५ विद्यार्थ्यांपैकी २५४ विद्यार्थी सहभागी झाले होते.