मुंबई : भारतातले तब्बल ९५ कोटी लोक इंटरनेट कनेक्टीव्हिटी पासून लांब असल्याची धक्कादायक माहिती असोचेम आणि डेलोलाईटच्या अहवालात म्हटले आहे.भारतात जगातली सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही ती अद्याप फक्त ३५ कोटी लोकांनाच ही सेवा उपलब्ध झाल्याचं अहवालात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात इंटरनेटच्या प्रसार जोमानं होत असल्याचं असोचेमनं म्हटले आहे. देशात डिजीटल साक्षरता वाढवण्याची गरज असल्याचंही अहवालानं म्हटलंय. इंटरनेटविषयी माहिती देणाऱ्या, माहितीच्या महाजाला वापर सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था उभ्या करण्याची सूचनाही या अहवालात देण्यात आल्या आहे. 


जागतिक संस्थाच्या संयुक्त विद्यमानं देशातल याविषयी कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात काम करण्याची गरज असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकार होणार आणि कॅशलेस व्यवहारांचा कशी चालना मिळेल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.