स्मार्टफोन युजरसाठी खुशखबर, एअरटेल देतोय ५ जीबी फ्री डेटा, असे मिळवा...
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी या महिन्यात जिओची ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर सर्व जगातील टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये घबराट पसरली आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी या महिन्यात जिओची ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर सर्व जगातील टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये घबराट पसरली आहे.
रिलायन्स जिओने जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लानसह फ्री व्हॉइस कॉल आणि फ्री नॅशनल रोमिंग देण्याची घोषणा केली.
या घोषणेमुळे एअरटेल, व्होडाफोन, आयडीया आणि बीएसएनएलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचा भाग म्हणून आपल्या ग्राहकांना थांबविण्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत.
एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी एक बंपर ऑफरची घोषणा केली आहे. एअरटेलने ५ जीबी फ्री इंटरनेट डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पण एअरटेलची ही ऑफर एका रात्रीसाठी आहे. हा फ्री डेटा फक्त १२ am ते ६ am मिळणार आहेत. डेटा स्पीड हा सब्सक्राइब डेटानुसार असणार आहे. या शिवाय इतर वेळी डेटा यूज केला तर रेग्युलर डेटा पॅकमधून कट होणार आहे.
एअरटेल जॅकपॉट ऑफर अशी मिळवा
खालील लिंकला डाऊनलोड करा...
http://www.airtel.in/free?icid=home_jackpot_row_4_column_1
- आपल्या फोनवर myAirtel APP इन्स्टॉल करावे लागले.
-myAirtel APP च्या माध्यमातून तुम्ही या जॅकपॉट योजनेचा लाभ उचलू शकतात.
- myAirtel APP वर जॅकपॉट पेजच्या सर्व अॅप टास्ट असणार आहे.
- ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
- हा डेटा २८ दिवसात संपवायचा आहे.