मुंबई : नोटंबदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅशलेस योजना यशस्वी करण्यासाठी अनेक कंपन्या डि‍जिटल पेमेंटवर भर देत आहेत. एअरटेलने देशातील पहिली पेमेंट्स बँक सुरु केली आहे. ज्यामध्ये १ रुपय जमा केल्यास एक मिनिट फ्री टॉकटाईम दिला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर १ हजार रुपयासह एअरटेल पेमेंट बँक खातं उघडता तर तुम्हाला १ हजार मिनिटं फ्री दिले जाणार आहेत. देशातील कोणत्याही भागात याचा वापर करता येणार आहे. ही सुविधा फक्त एअरटेल टू एअरटेलसाठी सुरु केली आहे.


सोबतच बँकने सेविंग अकाउंटवर ७.२५ टक्के व्याज देण्याची देखील घोषणा केली आहे. आतापर्यंत एअरटेल मनीच्या रुपात ई-वॉलेट सुविधा देणारी कंपनी एअरटेल रिजर्व बँकेकडून पेमेंट बँकेचं लायसेन्स मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे. पेमेंट बँकेत ग्राहक जास्तीत जास्त १ लाख रुपये जमा करु शकतात.


पेमेंट बँक त्यांच्या ग्राहकांना सेविंग आणि करंट दोन्ही प्रकारचे खाते उघडण्याची सुविधा देत आहे. आरबीआयच्या नियमांनुसार पेमेंट बँक एटीएम आणि डेबिट कार्ड सेवा देणार आहे. पण क्रेडिट कार्ड देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. पेमेंट बँकेचा मुख्य उद्देश हा लोकाना बँकिंग सुविधा पुरवण्याचा असतो.