मुंबई : एअरटेलने पुन्हा एकदा नवी ऑफर लाँच करत रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. या नव्या ऑफरमध्ये एअरटेल आपल्या पोस्टपेड यूजर्सना पुढील तीन महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टपेड ग्राहकांना ही ऑफर मिळवण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत माय एअरटेल अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. यानंतर त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी फ्री ३० जीबी डेटा मिळणार आहे. 


या नव्या ऑफरमुळे जिओला चांगलीच टक्कर मिळणार आहे. नव्या ऑफरविषयी बोलताना भारतीय एअरटेलचे सीईओ गोपाळ विठ्ठल म्हणाले, पुढील तीन महिन्यांसाठी फ्री डेटाची मजा घ्या. ही ऑफर लांबच्या सुट्टींसाठी चालू राहील.